पुसद प्रतिनिधी (अरुण बरडे) –
आज दिनांक ०२ /०३/२०२४ रोजी शनिवारला सकाळी ८.०० वाजता जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा पार्डी येथे शाळा व्यवस्थापन समिती २०२३ -२४ ची स्थापना (पुनर्गठन ) करण्याकरिता सर्व पालकांची सभा आयोजीत करण्यात आली होती.
सदर समितीचे गठन बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम २००९ शासन निर्णय, क्रमांक पी आर ई २०१०/प्र.क्र.२१७/प्रा. शि १/ दिनांक १७ जुन २०१० चे शासन निर्णया- नुसार पालक प्रतिनिधी म्हणून समिति सदस्य संख्येच्या ७५% करण्याचे निश्चित करण्यात आले. माजी अध्यक्ष, प्रमुख पाहूणे तसेच उपस्थित पालक यांच्या सहमतीने खालील पालकांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्यध्यापिका बेद्रे मैडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच उषाताई जाधव व माजी अध्यक्ष उपस्थित होत्या. सभेत नियमानुसार ८ पालकांची सदस्य म्हणून निवड करून त्यांच्यामधून अध्यक्ष म्हणून नागोराव चिरमाडे, उपाध्यक्ष म्हणून अनिता गवळी, तर सदस्य म्हणून प्रदिप केवटे, लता कानडे, शिवकन्या तोरडमल, विजय गोरे, शालीनी केवटे, गजानन आंडगे यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण प्रेमी म्हणून भरारी संस्कार केंद्र पार्डी तथा व्हॉईस ऑफ़ मिडिया चे प्रसिद्धी प्रमुख अरुण बरडे यांची निवड करण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन ढगे सर यांनी केले. सभेला शिक्षक वृन्द तसेच मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.
——————————————————————
– आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा.
– बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी संपर्क करा.
- अरुण बरडे – 9921 722 726
- रवी शिंगणकर – 87 88 86 42 98




