Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपुसद नगरपालिकेवर, ताला लावण्यास हजारो आंदोलक दणाणले | lock down Pusad Municipality

पुसद नगरपालिकेवर, ताला लावण्यास हजारो आंदोलक दणाणले | lock down Pusad Municipality

        

आंदोलन आक्रमक होताच नमुना ड, घरकुल चा निधी आणि बेघरांचा प्रश्न लागला मार्गी 

 महाविकास आघाडीच्या लढाईला यश, ताला ठोको च्या धसक्याने प्रशासन झाले जागी

           पुसद/.       शहरातील गोर गरिबांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी नमुना ड देण्यात यावा. घरकुलाचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे. व बेघरांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी 17 दिवसापासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या साखळी उपोषणाची दखल नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने त्यांची कुंभकर्णी झोप उडविण्यासाठी ताला ठोकोची भूमिका घेताच आणि या आंदोलनाला हजारोच्या संख्येने महिला पुरुष सामील झाल्याने चांगलीच तारांबळ उडाली. अखेर लेखी आश्वासनानंतर प्रशासनावर ताला ठोकोची नामुष्की उडवण्यापासून राहिली. तूर्तास आजचा साला ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे परंतु दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास 16 फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देत साखळी उपोषण मागण्यांची पूर्तता होईपर्यंत चालूच राहणार असल्याची माहिती यावेळी आंदोलकाच्या वतीने देण्यात आली.

हे ही वाचा 👉 विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन | Pusad 

            हरातील सर्व समाजाच्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर व जागा नसलेल्याना न्याय मिळवून देण्यासाठी 16 जानेवारी पासुन साखळी उपोषणाची दखल नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी घेत नव्हते. परंतु पीडित नागरी, जागरूक नागरिक व सामाजिक संघटनांनी या साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता, सहभाग नोंदवला होता. परंतु खरोखरच कुंभकर्णी झोपेतील नगर प्रशासनाला गोरगरिबांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नसल्याने अखेर महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनाला तीव्र स्वरूपाचे आणण्यासाठी व गोरगरिबांच्या हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आज ताला ठोकोचा इशारा नगर प्रशासनाला दिला होता. इशारा देऊनही गोरगरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. अखेर आज नगरपालिकेला ताला ठोकण्यासाठी सकाळी दहा वाजता पासून हजारोंच्या संख्येने महिला पुरुषांनी आंदोलकांनी नगरपालिकेच्या गेटवर गर्दी केली होती. अशी परिस्थिती असताना केवळ थातूरमातूर लेखी पत्र घेऊन आलेल्या नगरपालिका प्रशासनाला संतापलेल्या आंदोलकांनी परत पाठविले. आंदोलकांनी आपले आक्रमक रूप दाखवून आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासनाला धडा शिकवण्याचा जागृत करण्याचा ठाम निर्णय घेतल्याने अखेर आंदोलकाच्या मागण्याची दखल घेण्यात आली. आणि नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात आले. नमुना ड मिळवून देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मिळाले. 

हे ही वाचा 👉 आशा वर्करची ऑर्डर काढण्याकरिता एक लाख रुपयांची मागीतली लाच | Pusad 

         

           घरकुलाचा थकीत असलेला निधी पंधरा दिवसाचे आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच बेघरांच्या प्रश्नावर शासकीय जागा उपलब्ध करून बेघरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळतात आंदोलकांनी आनंद साजरा केला.  आंदोलकाची आक्रमक भूमिका पाहता शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी आंदोलकांना नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. परंतु गोरगरिबांच्या हक्काचे व जीवन मरणाची संबंधित असलेला विषय असल्याने याकडे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या असल्याचे जनमानसात महाविकास आघाडी बद्दल व या उपोषणाला आंदोलनाला सहभागी व पाठिंबा करणाऱ्यांचे सर्वांकडून कौतुक केल्या जात.

हे ही वाचा 👉कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जागविण्यासाठी ताला ठोको आंदोलन | Pusad 

         हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मूळ राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) पुसद शहर अध्यक्ष साकीब शाह, वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, विजय बाबर, अर्जून राठोड, आदींच्या पुढाकाराने आजचा ताला ठोको आंदोलन यशस्वी व आक्रमकरीत्या पार पडले. या आंदोलनामध्ये सलीम भाई, दीपक अवचार, माधवराव वैद्य, मारोती भस्मे, आयुब पटेल, ज्ञानेश्वर वाढ, सिद्दिकी जोया, ॲड अभिषेक रुडे, नवाज अली, जहिर मामु, इस्तियाक भाई, इम्रान पटेल, बाबाराव खिल्लारे, कमल विश्वनाथ पाईकराव, शेख वाजेद अक्रम, वैशाली भगत, सुशीला जोशी, पुष्पा मनवर, सांची भगत, लता वाकोडे, साधना वाठोरे, साधना भगत, देवका राठोड, संगीता पाईकराव, अर्जुन भगत, भास्कर बनसोड, गौतम भगत,  राजरत्न लोखंडे, अरुण राऊत, मधुकर सोनवणे, निवृत्ती थोरात, ललिता पोघे, ललिता गाडगे, दीपा हराळ, विद्याताई नरवाडे, सरस्वती पडघने, परमिला सूर्यतळ, भाग्यश्री जाधव, नंदा सुरोशे, संतोषी गायकवाड, मोहन विश्वकर्मा, दिनेश गवळी रवी बहादुरे, जानवळकर, मायाबाई ढवळे, ताराबाई पवार, आदींसह शेकडो आंदोलक सहभागी होते.

Social media links

RawBharat Channel – Click Hair

Raw Bharat.quora.com – Click Hair

Facebook.com/RBharat.in – Click Hair

WhatsApp Channel – Click Hair

 RAW भारत News

       आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा.

बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आम्हाला संपर्क करा.

– अरुण बरडे – 9921722726

– रवि  शिंगणकर – 8788864298

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments