Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeआशा वर्करची ऑर्डर काढण्याकरिता एक लाख रुपयांची मागीतली लाच

आशा वर्करची ऑर्डर काढण्याकरिता एक लाख रुपयांची मागीतली लाच

 

आशा वर्करची ऑर्डर काढण्याकरिता एक लाख रुपयांची मागीतली लाच … 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांचेवर ACB ची धाड़ 

प्रतिनिधी – 

         हागाव येथे प्रभारी तालुका अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. आडे यांना आज साडेपाच वाजता च्या दरम्यान पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दरम्यान त्यांना पुढील चौकशीसाठी विश्रामगृहात नेण्यात आले, असून त्या ठिकाणी त्यांचे बयान नोंदविण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती.

हे ही वाचा 👉कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जागविण्यासाठी ताला ठोको आंदोलन | Pusad 

       हागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांनी आज आशा वर्कर साठी ऑर्डर  काढण्याकरिता एक लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार माळवागत येथील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी कोमलची नुकतीच आशा वर्कर साठी मुलाखत झाली होती. या मुलाखतीनंतर तिचा नोकरीसाठी आर्डर  काढताना एक लाखाची मागणी करण्यात आली होती. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी पत्नी उच्चशिक्षित (MSW) आहे. तेव्हा पहिले आर्डर काढा नंतर देणे घेणे बघू म्हणून विनंती केली. तेव्हा  त्यांनी आता पंचवीस हजार रुपये द्या अशी मागणी केली. तेव्हा  चव्हाण यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत खाते यांच्याकडे तक्रार नोंदविली. खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र काळी (दौलत.) येथे पंचवीस  हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. 

हे ही वाचा 👉कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जागविण्यासाठी ताला ठोको आंदोलन | Pusad 

      दरची कारवाई अँटीकरप्शन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, अंमलदार अब्दुल वसीम, सुधीर कांबळे सचिन भोपर, महेश वाकोडे, सविता राठोड, चोलक संजय कांबळे यांनी केली. 

Social media links

RawBharat Channel – Click Hair

Raw Bharat.quora.com – Click Hair

Facebook.com/RBharat.in – Click Hair

WhatsApp Channel – Click Hair

 RAW भारत News

       आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा.

बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आम्हाला संपर्क करा.

– अरुण बरडे – 9921722726

– रवि  शिंगणकर – 8788864298

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments