Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsकर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शालेय साहित्याचे वाटप

पुसद ( प्रतिनिधी ) –

    माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद मागील सात वर्षापासून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री वर कार्य करत आहे. माणसात देव शोधणारे स्वच्छतेचे पुजारी, माणसांच्या मनावर साठलेली अंधश्रद्धा कीर्तनाच्या माध्यमातून धुऊन काढणारे कर्मवीर संत गाडगेबाबा या महामानवाच्या स्मृतिदिनानिमित्त कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतिस्थळ जाधव बाग, निंबी पार्डी रोड पुसद येथे पुसद परिसरातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून गाडगेबाबा यांचे शिक्षण विषयक असलेले विचार समाजाला कसे अंधश्रद्धेतून दूर करतात, यावर मान्यवरांनी आपले विचार कथन करून मार्गदर्शन केले. आजचा विद्यार्थी हा भावी नागरिक आहे. विद्यार्थ्यांना अनेक थोर संतांच्या अ मानवीय कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


    या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव होते. प्रमुख पाहुणे अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद डॉ.अतुल रुणवाल, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंतराव देशमुख, सप्त खंजेरी वादक पंकज पाल महाराज, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.भारत घोगरे महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे सदाशिवराव चतुर, समाज कल्याण उपसंचालक माधवजी वैद्य, गुरुदेव सेवा मंडळाचे गणेश धर्माळे सर, विनोद मनवर,  मदनगर मोहन नागपूरकर, नरेश ढाले, श्रेयश राऊत, गोपाल माने, मोहन चतुर, अभिषेक राठोड, दिगंबर मस्के, बाबाराव अंबोरे, दीपक मोरे, संतोष अंबोरे, संभाजी केवटे ,विठ्ठल येवले, संतोष गायकवाड, दत्ता मस्के, प्रकाश भोसले, अविनाश राठोड, पंजाबराव गडदे, विठ्ठल उघडे, अविनाश शेट्टी, गणेश सावंत,मोनिका जाधव, रेखा आगलावे, प्रियंका बेले, शांताबाई जाधव, उज्वला मोरे, रेखा अंबोरे, इंदुबाई अंभोरे, अनुसया मस्के, शकीलाबाई सय्यद, अर्चना पैठणकर, माणुसकीची  भिंत  फाउंडेशनचे  अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष संतोष गावंडे, सचिव सोहम नरवाडे, सदस्य पंजाबराव ढेकळे, अनंतभाऊ चतुर, सोनू पाटील, दीपक घाडगे, राजू जाधव, धनजय आघाम व परिसरातील असंख्य  नागरिक उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्यासाठी  व जहिराती संपर्क करा. 

👉 अरुण बरडे मो. नं. ९९२१७२२७२६ 

👉 रवि शिंगनकर मो. नं. ८७८८८६४२९८

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments