Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsसंगणक परिचालकांचे १३ डिसेंबरला नागपुरात वादळ ....!

संगणक परिचालकांचे १३ डिसेंबरला नागपुरात वादळ ….!

हजारो संगणक परिचालक धडकनार नागपुरात .!

संत्री होणार महाग… !

 पुसद –  प्रतिनिधी 

आपल्या १२ वर्षापासून
प्रलंबित
 असलेल्या
मागण्या शासनापुढे दरवर्षीप्रमाने याही वर्षी मांडण्यासाठी ग्रामपंचायतमधील सर्व
ऑनलाइन काम करणारे हजारो संगणक परिचालक नागपुरात दाखल होणार आहेत. शेतकरी कर्जमाफी
योजना
, प्रधानमंत्री
घरकुल योजना
, स्वच्छ
भारत मिशन
, जलजीवन
मिशन
, शासन
आपल्या दारी
, आयुष्मान
भारत योजना
, घर घर
तिरंगा- घर घर तिरंगा
,
आशा अनेक योजना राबवत, ग्रामीण भागातील सुमारे ६
कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य हे लोक (सुटाबुटातले साहेब) “
रोजगार
हमीच्या मजुरापेक्षाही कमी मजुरीत करत आहेत. “


कोरोना काळात आरोग्य विभागाच्या सोबत महत्वाची कामगिरी  याच संगणक परिचालकानी बजावली होती, ही सेवा करताना त्यांच्यातील १९ संगणक परिचालकानी जीव सुद्धा गमावला हे विशेष.

असे तांत्रिक, सामाजिक, आलौकिक व  जनता आणि शासनाच्या पदोपदी कामी पडणारे संगणक परिचालक आजही मागील १२ वर्षापासून टिचभर पोटासाठी दरवर्षी आंदोलन व मोर्चे करताना दिसत आहेत. 

ज्याप्रमाणे वारकरी दरवर्षी न चुकता पंढरीच्या वारीला येतात, त्याप्रमाणे हे परिचालक दरवर्षी नागपूर-मुंबई या ठिकाणी येऊन आपले गाऱ्हाणे विठ्ठलरूपी शासनासमोर मांडताना दिसून येत आहेत.”  मात्र अजूनपर्यंत त्यांना विट्ठल  प्रसन्न झाला नाही, असे एका परिचालक भक्ताने बोलताना सांगितले. मात्र यावेळेस न्यायरूपी प्रसाद घेतल्याशिवाय परत जाणार नाही आसा निर्धार सुधा त्यानी व्यक्त केला. 


कोणत्या आहेत मागण्या ? –

  • मा. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतिबंधात समावेश करून ग्रामपंचायत स्तरावर शासन सेवेत सामावून घ्यावे. 
  • जर त्यात काही अडचणी असतील किंवा वेळ लागत असेल तर किमान वेतन कायद्यानुसार किमान 20 हजार रुपये मानधन मिळावे. 
  • शासन सेवा मिळेपर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी, टार्गेट पद्धत व चुकीची मानधन पध्दत त्वरित बंद करावी. 
  • जिहा परिषद व पंचायत समितीच्या ऑपरेटरना ५ हजार वाढ जाहिर  करावी. व रिक्त जागा भराव्या. 

  • आपल्या परिसरातील बातम्यासाठी  व जहिराती संपर्क करा. 
    👉 अरुण बरडे मो. नं. ९९२१७२२७२६ 
    👉 रवि शिंगनकर मो. नं. ८७८८८६४२९८

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments