पुसद – (तालुका प्रतिनिधी )
पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भोजला गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. विविध योजनाची माहिती गावागावात पोहोचावी यासाठी संपूर्ण देशभर या यात्रेचे आयोजन करुन ही मोहीम राबविली जात आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हॅनमधील चित्रफितीच्या आधारे गटविकास अधिकारी संजय राठोड
यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, हर घर नल योजना, पीक विमा, जनधन योजना, प्रधानमंत्री सन्मान निधि योजना, बचत गट – ड्रोन योजना अशा अनेक योजनेची माहीती
लाभार्थ्यांना दिली. व योजनाचा लाभ घेण्याचे सर्व नागरिकाना आवाहन केले.
या कार्यक्रमला पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी पिंपळे साहेब, बोजेवर साहेब, भोजला ग्रामपंचायतच्या सरपंच सौं. वंदना गजानन ठाकरे, उपसरपंच रवींद्र भाऊ निकम, माजी प. स. सदस्य अशोकराव राऊत , डॉ. साहेबराव चौधरी, गजानन ठाकरे, सचिव एस टी तडसे, गावातील सर्व आशा, अंगणवाडी सेविका, श्री शिवाजी विद्यालयातील सर्व शिक्षक, तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
(प्रतिनिधी – सचिन ठाकरे )
👉 अरुण बरडे मो. नं. ९९२१७२२७२६
👉 रवि शिंगनकर मो. नं. ८७८८८६४२९८





