पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून केले अभिवादन !
मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तु जगाला शिकवली व्याख्या, माणसातल्या माणुसकीची…
तू देव नव्हतास, तू देवदूत ही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास !
पुसद – प्रतिनिधी
पुसद पासून ४ किमी अंतरावर असलेल्या पार्डी येथे आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावातील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारअर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कार्यालय पार्डी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व हार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्यासाठी व जहिराती संपर्क करा.
👉 अरुण बरडे मो. नं. ९९२१७२२७२६
👉 रवि शिंगनकर मो. नं. ८७८८८६४२९८





