Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsसिटू संघटनेचा विदर्भ स्तरीय विजय मेळावा संपन्न

सिटू संघटनेचा विदर्भ स्तरीय विजय मेळावा संपन्न

पुसद मधील आशा व गटप्रवर्तक यांचा सक्रिय सहभाग ….

पूसद प्रतिनिधी – 

            सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन म्हणजेच सिटू  संघटनेचा विदर्भस्तरीय भव्य विजय मेळावा शेगाव येथे संपन्न झाला. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड लाभले होते. मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे महासचिव कॉ. एम. एच. शेख यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे कोषाध्यक्ष कॉ. के. आर. रघु हे होते.

             मेळाव्याला राज्याध्यक्ष कॉ. आनंदी  अवघडे, राज्य सचिव कॉ.  पुष्पा पाटील, कोषाध्यक्ष  कॉ. अर्चना घुगरे यानी प्रमुख उपस्थिती दर्शविली. मेळाव्यात आशा व गटप्रवर्तक यांची कर्तवे, जबाबदारी, शासनाला त्याची  गरज तसेच काम करीत असताना त्याना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संघटनेची पुढील दिशा व नियोजन यावर प्रकाश टाकण्यात आला. 

            या मेळाव्याला यवतमाळचे  जिल्हाध्यक्ष शंकरराव दानव,  व सचिव कॉ. उषा मुरखे यांच्या नेतृत्वात पुसद मधून तालुका अध्यक्ष अर्चना सावरकर, उपाध्यक्ष अरुणा सूर्यवंशी, गट प्रवर्तक ज्योती मोहुर्ले, पल्लवी बरडे, शारदा इंगोले, अंजू जोगी, मिना सुरोशे, वनिता मनवर, दिपाली राउत,  व  प्रा. आ. केंद्र शेंबाळपिंपरीच्या आशा सह हजारो आशा उपस्थित होत्या.  

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा –

👉 अरुण बरडे,  मो.  ९९२१ ७२२ ७२६   

👉 रवि शिंगनकर , मो.  ८७८८ ८६४ २९८ 

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments