Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपडत्या पाण्यात सुद्धा धडकले जिल्हा परिषदवर ! संगणक परीचालकांचा टीचभर...

पडत्या पाण्यात सुद्धा धडकले जिल्हा परिषदवर ! संगणक परीचालकांचा टीचभर पोटासाठी संघर्ष सुरूच …

 

ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचे जिल्हा परिषद यवतमाल समोर एक दिवसीय धरणे आंदोलन 

– संपूर्ण राज्यात राज्याध्यक्ष गुणवंत राठोड यांच्या नेतृवात आंदोलन….

यवतमाळ – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पहिल्या टप्प्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले होते.

            मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करनाऱ्या ग्रामपंचायत संगणक परीचालकांचा विविध मागण्या प्रलंबित असून, विविध आंदोलने, मोर्चे तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा शासन आणि कंपनीच्या वतीने संगणक परीचालकांची बोळवण केली जात आहे. शासनामार्फत माजी सनदी अधिकारी मा. अभय यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या समितीने  सुधारित आकृतिबंधाची शिफारस केली असून, त्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतमध्ये क्लर्क कम डाटा एन्ट्री पदावर सरसकट नियुक्ती करावी, आकृतीबंधात समाविष्ट करण्यास वेळ लागत असल्यास किमान मासिक २०,०००/- वेतन द्यावे, टार्गेट पूर्ण करण्याच्या नावावर बोगस कामे करवून घेऊ नये, ग्रामविकास विभागाच्या परवानगी शिवाय ईतर विभागाची कामे देण्यात येऊ नये, तसेच मागील थकीत असलेले वेतन तात्काळ देण्यात यावे, जॉब सिक्युरिटी असावी या मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते.

        याचाच दुसरा टप्पा म्हणून आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद यवतमाळ येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

        मागील १२ वर्षापासून निवेदने, मोर्चे, आंदोलने करून सुद्धा शासनाने दखल घेतली नसल्याने यापुढील आंदोलने हे तीव्र स्वरूपाची करणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षच्या वतीने कळविण्यात आले.

        त्याअनुशंगाने दिनांक ०४/१२/२०२३ रोजी राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांचे घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  त्यानंतर ही मागण्याचा विचार न झाल्यास या हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर ११ डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले.

        आजच्या या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, यशवंत पवार, युवासेनेचे सुमित खांदवे, पुरुषोत्तम राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम, उबाठा गटाचे संतोष ढवळे, आव्हान संघटना जिल्हाध्यक्ष पडदुमन जवलेकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन पाठीबां दिला. 

        यावेळी जिल्हा परिषद यवतमाळ चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री आभाळे साहेब यांनी यवतमाळ जिल्ह्याकडून संगणक परिचालक यांच्या आवश्यकतेचा सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवन्याचे  आश्वासन दिले.

        आंदोलनात राज्याध्यक्ष गुणवंत राठोड सह राजकुमार महल्ले, सागर पायताळे, अझर खान, शरद पवार, पुसद तालुकाध्यक्ष अरुण बरडे, उमरखेडचे देवेंद्र चव्हाण, महागावचे  जयकुमार मिरासे, आर्णीचे दिनेश फुसांडे,  बाभुळगावचे सोम धवणे, कळंबचे स्वप्नील धनरे, वणीचे राजकुमार वडसकर, मारेगावचे देवा किनाके, नेरचे निलेश आडे, दिग्रसचे आकाश पाईकराव, यवतमाळचे सुरज जयस्वाल, झरीचे राहुल दांडेकर, राळेगावचे बशीर शेख, केलापूरचे चंद्रकांत कोडापे सह विनोद सोनटक्के, सचिन पत्रकार, विकास राऊत, चंद्रकांत सातपुते, सचिन देवतळे, अतुल राऊत, गणेश असुटकर, प्रमोद पवार, राजू राठोड, गौरव इंगळे, मतीन शेख, अमोल दुबे, ईश्वर जाधव, सचिन ठाकरे, गजानन चव्हाण,  शुभम ठेंगे, निरंजन बिरंगने, ऋषी जाधव, योगेश बुरकुले, सुनीता खंडारे, संगीता बदूरकर, दीपाली चिरडे, पूनम वेनोइत सह  जिल्ह्यातील असंख्य संगणक परिचालक उपस्थित होते.


————————————————————————बातम्या व जाहिराती करीता संपर्क –

अरुण बरडे –      मो. नं. ९९२१ ७२२ ७२६ 

रवि शिंगनकर  – मो. नं. ८६०५ ४६२ ३५० 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments