पुसद – (तालुका प्रतिनिधी)
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने त्यावर लगेच कार्यवाही सुरू केली आहे.
त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत पार्डी अधिनस्त सेवादासनगर व गणेशपुर या गावांना तलाठी अमोल राठोड, ग्रामसेवक विजय ईसळकर , कृषी सहाय्यक करे यांनी भेट देऊन, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसामुळे तूर, कापूस, हरभरा, केळी, पपई व भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ;याची पाहणी करून व त्यांनी अहवाल तयार केला.
यावेळी सोबत ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे, सुनील राठोड, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव, मोहन पवार व इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.
—————————————————————————————————————————–
—————————————————————————————————————————–
– आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा.
– अरुण बरडे, मो. 9921722726
—————————————————————————————————————————–
—————————————————————————————————————————–






