Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsशुभेच्छांसह ॲड.आशिषभाऊ देशमुख

शुभेच्छांसह ॲड.आशिषभाऊ देशमुख

 सकारात्मक ऊर्जेने भारलेले युवा नेतृत्व :  
ॲड. आशिषभाऊ देशमुख    

…………………

देशाला,राज्याला नवीन नेतृत्वाची नेहमी कास असते.उच्च संस्काराच्या मुशीत हे नेतृत्व

आकारास आले तर राजकीय व समाज जीवनाला नवी दिशा मिळू शकते.  लोभस, समंजस,तरुण आणि तितकेच प्रामाणिक नेतृत्व पुसद येथील सकारात्मक ऊर्जेने भारलेले ॲड. आशिषभाऊ पंजाबराव देशमुख यांच्या रूपात  उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांनी ग्रामीण भागाच्या परिसीमा ओलांडत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष या नात्याने वकीली क्षेत्रात महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व दिले आहे. सध्या ते महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे क्रियाशील सदस्य आहेत.

सुसंस्काराची मूस संस्कारक्षम आदर्श घराण्यात घडत असते.पुसद तालुक्यातील जांबबाजार येथील दिवंगत अण्णासाहेब देशमुख हे जुन्या पिढीतील कर्तुत्ववान,समाजशील व्यक्तिमत्व.गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे अण्णासाहेब मोठ्या मनाचे नेते . त्यांचे सुसंस्कृत घराणे.लोकोपयोगी कामात जीव ओतणारे. त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख घडले.वडिलांचा समाजसेवेचा वारसा सांभाळत वैद्यकीय व्यवसायातून
डॉ. पंजाबराव यांनी समाजसेवेची रीत जोपासली.  समाजसेवा, माणुसकी, प्रामाणिकपणा,मनाची श्रीमंती जपणारी ही वंशवेल ॲड.आशिषभाऊ देशमुख यांच्या  रूपाने नव्या पिढीच्या रुपात बहरली आहे.त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी संपादन केली .समाजातील दलित, वंचित आणि गोरगरीब लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर कायद्याचा अभ्यास असला पाहिजे,ही भूमिका घेत त्यांनी पुढे कायद्याची पदवी घेतली.केवळ पदवी पुरते शिक्षण त्यांना पसंत नव्हते. प्रत्यक्षात त्यांनी पुसद येथील न्यायमंदिरात वकिली व्यवसाय सुरू केला.तरुण आणि सळसळत्या रक्ताचे ॲड. आशिषभाऊ देशमुख यांनी या नव्या व्यवसायात जम बसविला.एक प्रभावी  कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांचे स्वतःचे वलय तयार झाले.

ॲड.आशिषभाऊ देशमुख त्यांचे व्यक्तिमत्व विलक्षण प्रभावी आहे. उंच पुरा बांधा,देखणे राजबिंडे रूप,चेहऱ्यावर सदा स्मित आणि मुख्य म्हणजे मितभाषी.वागण्यात रुजूता,बोलण्यात लाघवीपणा,नम्रता,विनयशीलता.या आशिषभाऊ यांच्या गुणांमुळे कोणीही प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही.मुख्य म्हणजे समाजशील राजकारणाला अशा ओजस्वी चेहऱ्याची आवश्यकता असते.हीच बाब हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार शरद पवार यांनी अभ्यासू ॲड.आशिषभाऊ यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपविली.ॲड. आशिषभाऊ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रमुख आहेत.लोकनेते शरद पवार माणसे ओळखण्यात मातब्बर आहे.त्यांनी आशिषभाऊ यांच्यातील प्राविण्य पाहून नवोदित नेतृत्वाला चालना दिली.खरे पाहता,आशिषभाऊ यांचे वडील दिवंगत डॉ. पंजाबराव देशमुख माननीय शरद पवार यांचे जवळचे विश्वासू सहकारी . पवार व देशमुख कुटुंबियातील ऋणानुबंधाच्या गाठी अधिक घट्ट झालेल्या.त्यामुळे साहजिकच आशिषभाऊ यांच्यावर राजकारणापलीकडचे अतिव प्रेम .याच प्रेमापोटी पवार साहेब गुणवंत संकुलातील दिवंगत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आवर्जून आलेले होते . दृष्टेपण लाभलेल्या शरद पवार साहेबांना आशिषभाऊ देशमुख यांचे नेतृत्वगुण भावले .त्यामुळे भविष्यात आशिषभाऊ देशमुख यांच्यावर अधिक जबाबदारी राहणार, याबद्दलची खात्री वाटते .

पुसदच्या राजकारणात आता नव्या पिढीची वाटचाल सुरू झाली .या तरुण पिढीत ॲड.

आशिषभाऊ देशमुख यांची प्रतिमा ठसठशीत आहे.कार्यकर्त्यांना,मित्रांना अडचणीत मदत करणारे म्हणून आशिषभाऊ देशमुख यांचे नाव पुढे आहे . राजकारणात दिलेला शब्द पाळणे,हा गुण अलीकडे धूसर होत आहे.त्याचवेळी शब्दांना जागणारा युवा नेता म्हणून आशिषभाऊ देशमुख यांची प्रतिमा त्यांच्या चाहत्यांच्या मनात कोरली आहे.वास्तविक वातास शरद पवार साहेबांशी

त्यांचे अतिशय सुरेख संबंध आहेत.त्यांची पवार निष्ठा अबाधित आहे.मात्र, त्यांच्या मनात केव्हाही

अहंकार डोकावत नाही,हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू उल्लेखनीय म्हणावा लागेल .सामान्य कार्यकर्त्यांनाही ते स्वतः वेळ देतात.त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात.समाजसेवेची हीच खरी रीत म्हणावी लागेल. बरेचदा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामानिमित्त ते पुसद शहराबाहेर राहतात.परंतु, कार्यकर्त्यांचा संपर्क ते सदैव ठेवतात.

नव्या पिढीला राजकारणाची ओढ आहे.त्याच वेळी फारशी मेहनत न करता  राजकारणाची फळे सहजपणे पदरात पडावी, ही मानसिकताही आहे. ॲड. आशिषभाऊ देशमुख यांचा सकारात्मक कामांवर प्रचंड विश्वास आहे. तो पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात मोठी जबाबदारी आशिषभाऊ देशमुख यांच्यावर सोपविणार ,यात शंका वाटत नाही. त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, त्यांना उज्ज्वल भवितव्य लाभावे,हीच मनोमन प्रार्थना !

ॲड. आशिषभाऊ देशमुख यांनी सामाजिक कार्यासोबतच विधी , शिक्षण, बँकिंग, धार्मिक

अशा विविध स्तरावर मौलिक कार्य केले आहे.महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष

या नात्याने त्यांनी केलेली अनेकविध कामे त्यांच्या तत्परतेची साक्ष देतात.बार कौन्सिलचा सदस्य होणे हे पुसद सारख्या तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या वकीलासाठी खरे तर दिवस स्वप्न आहे.परंतु आशिषभाऊ देशमुख यांनी 2010 मध्ये

बार कौन्सिलची निवडणूक प्रचंड मताने जिंकून इतिहास घडविला.अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘ ट्रायल कोर्टास सशक्त करा’ हे ब्रीदवाक्य मनाशी बांधून वाटचालीस सुरुवात केली.बार कौन्सिलच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले व बार कौन्सिलला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले.याच कामाच्या बळावर मार्च 2018 मध्ये त्यांनी पुन्हा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी सर्वाधिक मते मिळवून विजय मिळविला.त्यांच्या कार्याची ही खरी पावती म्हणावी लागेल.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष असताना त्यांच्या कारकिर्दीत अनेक कामे मार्गे लागली.ज्युनियर वकिलांसाठी ‘सीएलइपी’ संकल्पने मार्फत चार दिवसीय निरंतर कायदेविषयक कार्यक्रम आयोजित करून .शिबिरांच्या माध्यमातून 2000 जूनियर वकिलांना प्रशिक्षण देण्यात आले.25 जिल्ह्यातील कार्यक्रमातून जूनियर वकिलांना नवीन व प्रचलित कायदेविषयक माहिती देण्यात आली.जेएमएफसी, दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश या पदांसाठी इच्छुक व होतकरू वकिलांसाठी निष्णात कायदे पंडित व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून प्रबोधन घडवून आणण्यात आले.या द्वारे 154 जुडीशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, सिविल जज ज्युनियर डिव्हिजन,16 जिल्हा न्यायाधीश तर काहींची इंडस्ट्रियल व लेबर जज म्हणून निवड झाली.तसेच वकिलांवर न्यायालयीन परिसरात अथवा न्यायदानाशी संबंधित कामकाजात कोणत्याही परिसरात असताना हल्ला झाल्यास गुन्हा दाखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण तरतुदींचा समावेश दुरुस्ती विधेयकात करण्यात आला.ज्युनियर वकिलांना अतिशय माफक दरात त्रैमासिक हप्त्याने 750

लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.वकिलांसाठी कर्जाची व्यवस्था व्हावी म्हणून इंडियन एडवोकेट्स मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी मुंबईची स्थापना करण्यात आली.या माध्यमातून जूनियर वकिलांना लायब्ररी तसेच कार्यालयासाठी कर्जाची उपलब्धता करून दिली.यासारख्या अनेक योजनांचा त्यांच्या कारकिर्दीत वकिलांना झाल्याने खऱ्या अर्थाने त्यांचे कार्य लोकाभिमुख ठरले.अतिशय कमी वयात धडाडी व जिद्दीने त्यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्याा इतिहासात नोंदविल्या गेले आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या राज्यविधी आयोगावर त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.तसेच इंडियन एडवोकेट मल्टीस्टेट मल्टीपर्पस कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबईचे ते संचालक आहेत.शिक्षण क्षेत्राशी ही त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.ते शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संचालक, श्री शिवाजी विद्यालय जांब बाजारचे अध्यक्ष तर गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलाचे कोषाध्यक्ष आहेत.तसेच श्रीदत्त शिखर संस्थान माहूर व श्री धनकेश्वर संस्थान पुसदचे विश्वस्त आहेत.त्यांच्या प्रकाराची प्रभावळ नेत्रदीपक असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विधी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची झेप लक्षणीय आहे.त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, नव्या दमाच्या, नव्या रक्ताच्या आणि सकारात्मक ऊर्जेच्या या समंजस युवा नेतृत्वाला आकाशात उंच भरारी घेण्याची शक्ती प्रदान करो, या शुभेच्छांसह ॲड.आशिषभाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या आभाळभर  मंगलकामना !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments