Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsनिंबी येथे धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियान संपन्न | DD News...

निंबी येथे धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियान संपन्न | DD News Pusad

धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियान संपन्न | DD News Pusad

पुसद –

आज मौजे निंबी येथे आज धरती आबा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुसद तहसील चे नायब तहसीलदार कदम साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्रांतीबाई जोगदंडे उपसरपंच निम्बी, उज्वला बळी सरपंच येलदरी, प्रकाश चव्हाण माजी सरपंच निम्बी, रामराव काळे पोलीस पाटील निम्बी, गणेश वंजारे पोलीस पाटील येलदरी उपस्थित  होते. 

यावेळी आदिवासी प्रकल्प विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग पंचायत विभाग, अंगणवाडी विभाग असा सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात  उपकृषी अधिकारी सूर्य साहेब, मंडळ अधिकारी मारकड साहेब, सहा. प्रकल्प अधिकारी चव्हाण साहेब यांनी नागरिकांना व लाभार्थ्यांना विविध विभागाच्या योजनाबद्दल मार्गदर्शन केले. व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 

अभियानात सुनील राठोड सेतू विभाग, गजानन लोलुरे आधार विभाग, नीता पाटील, दैवशाला खंदारे, डॉ. अनिता शिंगाडे, आर. डी. मुंडे, विशाल शेवाळे आरोग्य विभाग यांचे कडून नागरिकांना संबधित सेवा देण्यात आल्या. अभियान यशस्वी करण्यासाठी श्री पंडितकर ग्रामपंचायत अधिकारी निम्बी, श्री जाधव ग्राम महसूल अधिकारी निम्बी, श्री. करे सहा. कृषी अधिकारी, श्री. अमोल राठोड ग्राम महसूल अधिकारी, श्री मस्के, श्रीमती डुकरे सहा. कृषी अधिकारी, बाळू मस्के, शामराव पैठणकर, काचगुंडे, सागर गोरे, नाना रेणके यांनी अथक परिश्रम घेतले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments