Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsरस्त्यात चिखल की चिखलातून रस्ता – पार्डी गावातील रस्त्याची दुर्दशा | Mud...

रस्त्यात चिखल की चिखलातून रस्ता – पार्डी गावातील रस्त्याची दुर्दशा | Mud on the road or a path through the mud – The plight of the road in Pardi village

रस्त्यात चिखल की चिखलातून रस्ता – पार्डी गावातील रस्त्याची दुर्दशा

रस्त्यात चिखल की चिखलातून रस्ता – पार्डी गावातील रस्त्याची दुर्दशा
रस्त्यात चिखल की चिखलातून रस्ता – पार्डी गावातील रस्त्याची दुर्दशा

पुसद – मुख्यमंत्री (Prime Minister) ग्रामसडक योजनेअंतर्गत पुसद तालुक्यातील निंबी ते गाजीपुर रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याने मुरूम व गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मौजे पार्डी येथील गावातील रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्ता असा चिखलमय झाला आहे. त्यामुळे पायी चालनारे नागरिक तसेच वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या चिखलमय रस्त्याने पायदळ जाणे ही कठीण झाली आहे. मागील १०-१५ दिवसात अनेक वाहनधारकाचे छोटे-मोठे अपघातही (Accident)  झाले आहे. हा मुख्य रस्ता असल्याने याच रस्त्याने शाळाकरी विध्यार्थी शाळेत ये-जा करत असतात. त्यांना सुद्धा जाताना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय गावातील गरोदर मातांना प्रसूती करिता दवाख्नात याच रस्त्याने न्यावे लागते. यावेळेस काही अनुचित घटना घडू शकते. तेव्हा संबंधित विभागाने लक्ष देऊन, या रस्त्यावर गिट्टी व चुरी टाकून तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पार्डी, गणेशपुर, गोरेवाडी व गाजीपुर, जांबबाजार येथील नागरिक करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments