पुसद – आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा व पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत जिल्हास्तरीय सत्कार समारंभाचे आयोजन बळीराजा चेतना सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे पार पडले.
या विशेष प्रसंगी इयत्ता १० वी व १२ वीमध्ये विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा ‘राघोजी भांगरे गुणवंत योजने’ अंतर्गत प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मरसुळ येथील खालील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला:
कु. निकीता श्रीराम घुक्से – १० वी (92.80%)
सुमित प्रकाश दुमारे – १२ वी विज्ञान (81.50%)
अनिकेत खंडेराव डाखोरे – विज्ञान (79.50%)
अदिनाथ गणेश मैघणे – विज्ञान (79.33%)
कु. प्रगती श्रीराम घुक्से – विज्ञान (79.00%)
कु. योगिता आनंदराव डाखोरे – विज्ञान (77.00%)
कु. चंचल प्रेम भिसे – कला शाखा (71.83%)
या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मा. ना. प्रा. डॉ. अशोक उईके (आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. संजय राठोड (मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री, यवतमाळ) आणि जिल्हाधिकारी विकास मिना (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाला.
शाळेचा सर्वांगीण विकास आणि गुणवत्ता लक्षवेधी ठरत आहे. प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, संस्थाध्यक्ष जितेंद्र मोघे, युवा संचालक लिलाधर मळघणे, प्राचार्य ए. जी. सय्यद तसेच सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



