Thursday, February 19, 2026
Google search engine
HomePOLITICSसंगणक परिचालकांच्या मागण्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा; सुधीरभाऊ मुनगंटीवारांचा महत्त्वपूर्ण पुढाकार |...

संगणक परिचालकांच्या मागण्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा; सुधीरभाऊ मुनगंटीवारांचा महत्त्वपूर्ण पुढाकार | विधानसभा सभागृहात मांडला मुद्दा

मुंबई | संगणक परिचालकांच्या १० वर्षांपासून प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सन्माननीय माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुंगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी या मागण्यांची गंभीर दखल घेत विधानसभा सभागृहात हा विषय प्रभावीपणे उपस्थित केला.

विशेष म्हणजे, सुधीरभाऊंनी या विषयाच्या मागे ठामपणे उभं राहत मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेटून या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला आहे. ही बाब संगणक परिचालकांच्या आंदोलनासाठी एक मोठी आश्वासक पावती ठरत आहे.

सुधीरभाऊंनी संगणक परिचालकांच्या प्रतिनिधींना मुंबई येथे आमंत्रित करून त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. त्यानंतर त्यांनी प्रतिनिधींचे निवेदन स्विकारत त्यांच्या समस्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या. या सौजन्यपूर्ण भेटीत भाऊंनी दिलेला विश्वास आणि पाठिंबा पाहता, संगणक परिचालकांच्या प्रयत्नांना आता दिशा मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

या सकारात्मक घडामोडीमुळे संगणक परिचालकांच्या न्यायहक्काच्या लढ्याला नवसंजीवनी मिळाली असून, यापुढील वाटचालीत भाऊंचा सक्रिय सहभाग निश्चितच निर्णायक ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments