Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsलोहरा येथे ग्राम उत्कर्ष उपक्रमांतर्गत महसुली सुविधा

लोहरा येथे ग्राम उत्कर्ष उपक्रमांतर्गत महसुली सुविधा

पुसद – तालुक्यातील ग्राम लोहरा (जिल्हा यवतमाळ) येथे दिनांक 28 जुलै 2025 रोजी “धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियान” अंतर्गत महसुली सेवा पुरविण्याचा एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या आवश्यक शासकीय कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमामध्ये ग्रामस्थांना विविध प्रकारचे महसुली दाखले दिले गेले. यामध्ये 39 अधिवास प्रमाणपत्रे, 32 उत्पन्न दाखले, 5 रहिवासी प्रमाणपत्रे, 6 नॉन क्रिमिनलियर, 9 जात प्रमाणपत्रे, 10 प्रतिज्ञापत्रे3 भूमिहीन असल्याचे दाखले असा एकूण 103 दाखल्यांचा समावेश होता. या सेवा गावातच मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आयोजनात अनसिंग गावाचे आपले सरकार सेवा केंद्र चे VLE अब्दुल याकूब शेख सह,  ग्रामपंचायत लोहरा (ई) चे सन्माननीय सरपंच, तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. मोत्यावाड साहेब यांची सक्रिय उपस्थिती लाभली. याशिवाय तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्स, आणि स्वयंसहायता गटांच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधून शिबिर यशस्वी केले. गावातील नागरिकांची गर्दी लक्षात घेता नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने सेवा दिली गेली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण नागरिकांना वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वेळ, पैसे आणि ऊर्जा खर्च न करता गावातच शासकीय सेवा उपलब्ध करून देणे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील नागरिकांना मोठा दिलासा मिळतो.

या योजनेतून शासन आणि ग्रामस्थ यांच्यातील नाते अधिक दृढ होत आहे. गाव पातळीवर प्रशासन लोकांच्या घरापर्यंत पोहोचले असल्याचा अनुभव या उपक्रमातून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काही नागरिकांनी आपले अनुभव सांगताना, “याआधी अशा सुविधा मिळवण्यासाठी तीन-चार वेळा तालुक्याला जावे लागे, आज गावातच सगळे मिळाले,” अशी भावना व्यक्त केली.

धरती आबा अभियानाच्या माध्यमातून शासनाने घेतलेला हा उपक्रम ग्रामीण विकासासाठी सकारात्मक दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

– अरुण बरडे (DD NEWS PUSAD)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments