Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeसुनेच्या अस्मितेवर घरातच घाला, सासराच निघाला .... |DDNEWSPUSAD

सुनेच्या अस्मितेवर घरातच घाला, सासराच निघाला …. |DDNEWSPUSAD

मूल (जि. चंद्रपूर) | २५ जुलै
मूल तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या व स्वतःच्या लहान मुलीच्या डोळ्यांदेखत सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मूल पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही घटना २४ जुलै रोजी सकाळपासून रात्रीपर्यंतच्या वेळेत घडली. सकाळी सून शेतात रोवणीसाठी गेली होती. दुपारी घरी परतल्यानंतर आरोपी सासरा घरी आला आणि सुनेला अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. त्यावेळी पीडितेच्या लहान मुलीने हस्तक्षेप करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अजूनच संतप्त झाला.

सायंकाळी पीडितेची सासू घरी परतल्यानंतर तिने पतीला समज दिली. परंतु आरोपीने तिलाही शिवीगाळ केली आणि घराबाहेर निघून गेला. मात्र, रात्री १०:३० वाजता तो पुन्हा घरी परत आला आणि सुनेच्या खोलीचा दरवाजा खटखटू लागला. पीडितेने दरवाजा उघडण्यास नकार दिला असता, दरवाजा तोडण्याची धमकी दिली. त्याच्या भीतीने तिने दरवाजा उघडला.

तेव्हा त्याने खोलीत झोपलेल्या आपल्या लहान मुलीला बाहेर पाठवले आणि सुनेवर जबरदस्तीचा प्रयत्न करत विनयभंग केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडिता, तिची सासू आणि नणंद यांनी मूल पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ७५ व २ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करत आहेत.

या विकृत प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी स्थानिक स्तरावरही आवाज उठवला जात आहे.


(टीप: पीडितेची गोपनीयता राखण्यासाठी गावाचे नाव व इतर ओळख पटवणारी माहिती जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहे.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments