पोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) : दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, पोखरी येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साही आणि राष्ट्रभक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी सरपंच सौ. शकुंतलाबाई शंकर पुलाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच गजानन किसनराव ढोकणे, सदस्य संतोष विठ्ठलराव भालेराव, पंडित सारंगधर शिंदे, सौ. मीरा संजय कुरुडे, सौ. संगीता विलास ढोले, तसेच ग्रामपंचायत अधिकारी कु. आर. एल. बावणे, ग्रा प ऑपरेटर ओंकार शेषराव भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान काष्टे, दिगंबर पुलाते, शंकर ढोकणे, दत्तराव ढोकणे, केशव ढोकणे, पांडुरंग भालेराव, नामदेव भिसे, शंकर गायकवाड, दत्ता साखरे, ब्रम्हानंद मंदाडे, गजानन मंदाडे, यादव कांबळे, बाबुराव कांबळे दीनानाथ सरगर, पुंजाजी चीलकर , गौतम कांबळे, दिगंबर भालेराव, भागवत भालेराव, शिक्षक वृंद, कर्मचारी संतोष सखाराम दोडके, आशासेविका सौ. सुमित्राबाई भालेराव, अंगणवाडी सेविका सौ. कांता करे, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रा प ऑपरेटर श्री ओंकार शेषराव भालेराव यांनी ग्रामदैवत श्री संत भयन महाराज यांची प्रतिमा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोखरी येथे संतकवी ह भ प शेषराव महाराज पोखरी यांनी भक्तिभावाने भेट देण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भाषणं सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आयोजन ग्रामपंचायत व शाळा प्रशासनाने संयुक्तपणे केले.
हा सोहळा संपूर्ण गावाने एकत्र येऊन राष्ट्रभक्तीने आणि उत्सवाच्या वातावरणात साजरा केला.
– ओंकार भालेराव, DD NEWS PUSAD



