Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsनवक्रांती दुर्गा उत्सव मंडळाचा आदर्श उपक्रम : छोटे उपक्रमच परिवर्तन घडवितात —...

नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळाचा आदर्श उपक्रम : छोटे उपक्रमच परिवर्तन घडवितात — एस. टी. तडसे

पुसद प्रतिनिधी :
गावाच्या विकासासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत तालुक्यातील मांडवा या गावातील नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षी दुर्गा उत्सवाच्या वेळी डी.जे. चा खर्च टाळून त्या निधीतून गावातील सार्वजनिक ठिकाणी तार कुंपण करून मंडळाने लोकसहभागातून उपक्रम राबविला.

या सामाजिक उपक्रमाचे कौतुक म्हणून ग्रामपंचायतीतर्फे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी एस. टी. तडसे  म्हणाले की, “गावाच्या विकासासाठी मोठ्या योजनांपेक्षा लहान लहान उपक्रम अधिक प्रभावी ठरतात. ‘एक तरी वृक्ष देऊन वाढदिवस साजरा करा’  असे ते म्हणाले. हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे. खडकाळ स्मशानभूमीला आज या उपक्रमामुळे हिरवळ लाभली असून, ती जणू बागेचे रूप धारण करत आहे.”

गावात वृक्षारोपण, स्वच्छता आणि लोकसहभागातून होत असलेल्या या छोट्या उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडून येत असून तरुण पिढीत एकजुटीची भावना वाढीस लागल्याचेही तडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय राठोड (उपसरपंच) होते. यावेळी दत्तराव पुलाते (पोलीस पाटील), वसंता आडे (सोसायटी अध्यक्ष), रमेश ढोले, दादाराव पुलाते, दसरथ राठोड, गजानन आबाळे, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रदुम्न आबाळे, राहुल जाधव इत्यादी  उपस्थित होते.

गावातील नागरिकांनी नवक्रांती मंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत करत अशा उपक्रमांमुळे गावाच्या सामाजिक जाणीवा वाढत असल्याचे समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू धाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास राठोड यांनी केले.

– अरुण बरडे DD NEWS PUSAD –

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments