पुसद दि. 17 –चोंढी येथे क्रांतीसुर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा हे भारताच्या आदिवासी समाजातील महान स्वातंत्र्यवीर, सामाजिक सुधारक आणि क्रांतिकारी नेते होते. 1875 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध “उलगुलान” नावाची जनक्रांती उभारून आदिवासी जमातींचे हक्क व अस्तित्व वाचवण्यासाठी लढा दिला. अल्पायुष्यात (वय 25) त्यांनी समाजात जागृतीची क्रांती घडवली. देशाच्या इतिहासात त्यांचे योगदान अमुल्य मानले जाते.
या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंत लिंबाजी माळकर (माजी सरपंच तसेच आदिवासी सोसायटी अध्यक्ष) होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिरुद्ध विजयराव पाटील (श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालक) व सौ. मनीषा गजानन पांडे (सरपंच) उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री देविदास नामदेव पत्रे (पोलीस उपनिरीक्षक, आसेगाव पोलीस स्टेशन), श्री विशाल वसंत माळकर (जिल्हा मध्यवर्ती बँक मॅनेजर शाखा गौळ) आणि श्री प्रवीण सुखदेव माळकर (इंडियन ओव्हरसिज बँक मॅनेजर शाखा पुसद) यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमात श्री साहेबराव व्यवहारे, श्री मधुकर राठोड, श्री रामचंद्र आखाडकर, श्री मनोहर गावंडे, श्री दिनेश हांडे, श्री दत्तराव गरिबे, श्री सुखदेव माळकर, श्री शरद उघडे, श्री संतोष माळकर, श्री शेषराव आडे, श्री ज्ञानेश्वर पांडे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री विजय इसळकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, चोंढी शाखेमार्फत करण्यात आले होते. यात अध्यक्ष श्री प्रदीप उघडे, उपाध्यक्ष श्री विशाल नाटकर, सचिव श्री शरद पठारे, तसेच पोलीस पाटील श्री लक्ष्मण पांडे यांनी उत्कृष्टरित्या जबाबदारी पार पाडली. गावातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींत श्री आशिष साहेबराव माथने, कुमारी पायल राजेंद्रसिंह चौहान, विरका विकास राठोड, स्वाती तसरे मॅडम, रुंदन आडे सर, तसेच श्री शिलानंद माणिक पडघने यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक रामराव गावंडे व श्री शिलानंद माणिक पडघने यांनी केले. सुव्यवस्थापनाची जबाबदारी पोलीस पाटील श्री लक्ष्मण दिवाणजी पांडे यांनी तर मंडप सजावटीची जबाबदारी श्री भास्कर कौतिक दांडेकर (लिलाई मंडप डेकोरेशन, चोंढी) यांनी पार पाडली. अल्पउपहार व चहा-पाण्याची व्यवस्था क्रांतीसुर्य जननायक भगवान बिरसा मुंडा ब्रिगेड शाखा चोंढी यांनी केली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शांवर आधारित, सामाजिक एकता आणि आदिवासी अभिमान जपणारा हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला.



