चोंढी (ता. पुसद) :
पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत चोंढी येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष धोत्रे यांनी भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने मागील ९० दिवसांपासून ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या तयारीचा तसेच राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व विकास कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजाची परिपूर्ण माहिती घेऊन श्री. धोत्रे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात येणाऱ्या तपासणी चमूसाठी ग्रामपंचायतीला शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत चोंढीच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत कापडी पिशव्यांचे वितरणही करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत चोंढीला प्राप्त झालेले ISO प्रमाणपत्र माननीय संतोष धोत्रे यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. अमोलकुमार आंदेलवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. संजय राठोड, विस्तार अधिकारी श्री. संतोष डाखोरे, श्री शेख, सरपंच सौ. मनीषा गजानन पांडे, पोलीस पाटील लक्ष्मण पांडे, अशोक गावंडे, ज्ञानेश्वर पांडे, वसंत माळकर, शेषराव आडे, आखाडकर सर, उमेश हांडे, सहदेव जाधव, भाऊराव व्यवहारे, नंदकुमार आगलावे, पवित्र पडघने, ग्रामपंचायत अधिकारी विजय इसलकर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी चव्हाण सर, मुख्याध्यापक सांगानी सर, शिक्षकवर्ग, आरोग्य सेवक सानप सर, आशा स्वयंसेविका वंदना तोरकड, अंगणवाडी सेविका कविता ढगे, अंगणवाडी मदतनीस पूजा माथने, यशोदा आडे, ग्रामपंचायत कर्मचारी गुरुदेव गोदमले, अभिमन्यू जाधव, संगणक परिचालक दिनकर दांडेकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



