Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsभीम टायगर सेनेतर्फे भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भव्य मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम

भीम टायगर सेनेतर्फे भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भव्य मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम

पुसद प्रतिनिधी –

भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भीम टायगर सेनेच्या वतीने गुरुवारी (१ जानेवारी) पुसद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता तीन पुतळा परिसरात बुद्ध वंदना घेऊन शूर वीरांना मानवंदना देण्यात येणार असून, त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीमध्ये आदिवासी ढेमसा नृत्य, बंजारा डफडा नृत्य, महिला लेझीम पथक, लाठी-काठी आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी  सुभाषचंद्र बोस चौक मार्गे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोपास येणार आहे.

सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीम शाहीर व टीव्ही स्टार नागपूर येथील सूरज आतिश यांचा बुद्ध–भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके राहणार असून, उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश वाढवे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुनील खाडे हे जबाबदारी सांभाळणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  भीमरावदादा कांबळे, प्रा. डॉ. प्रशांत वासनिक, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विनोद फुलमाळी,  डॉ. मोहम्मद नदीम, विनोद शेङे, शितलकुमार वानखडे,  ॲड. आरिफ अहमद,  भोलानाथ कांबळे,  डॉ. शिवाजी भुरके,  बुद्धरत्न भालेराव,  आनंद भगत,  प्रशांत धुळे, विठ्ठल खडसे,  रवी ग्यानचंदानी,  ॲड. विश्वास भवरे,  किशोर मुजमुले,  भारत कांबळे,  मारोती भस्मे, गजानन जाधव, करण ढेकळे, पांडुरंग व्यवहारे, अश्विनीताई पुनवटकर, संजय राठोड, विजय बहादुरे, डॉ. शशिकांत इंगोले, नारायण ठोके, आशिषभाऊ काळबांडे, जगदीश सावळे, रावण शेङे, मिलिंद हट्टेकर, विजयभाऊ धुळे, बाबाराव उबाळे, करण भरणे, देवेंद्र खडसे, नागसेन मनवर, अक्षय उईके, सिद्धू दिवेकर, अशोक चव्हाण, प्रवीण राजहंस, बाळासाहेब कांबळे, गजानन हिंगमीरे, दिलीप खैरे, महेंद्र कांबळे, दीपक परिहार, अश्विन जयस्वाल, मनोज कांबळे, संदीप कावळे, ॲड. रवी वाघमारे, राजेश ढोले, समाधान केवटे, विनोद कांबळे,  लक्ष्मण पू. कांबळे, सुखदेव भगत, अर्जुन राठोड उपस्थित राहणार आहेत.

सदर माहिती भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाचे सल्लागार विष्णू सरकटे, जिल्हाध्यक्ष गीताताई कांबळे, अध्यक्ष जनार्धन झोडगे, उपाध्यक्ष प्रभाकर खंदारे आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्धन गजभिये व आर. पी. गवई करणार असून, आभार प्रदर्शन संतोष गायकवाड करणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी रविकांत शिंगणकर व अरुण बरडे  हे सांभाळत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments