Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपुसदमधील तीन NCC अधिकाऱ्यांना सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नती

पुसदमधील तीन NCC अधिकाऱ्यांना सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नती

पुसद – 
४७ महाराष्ट्र बटालियन, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी), यवतमाळ विभागाअंतर्गत पुसद येथील तीन एनसीसी अधिकाऱ्यांना सेकंड ऑफिसर या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुसद येथील एनसीसी ऑफिसर श्री विजय डोंगरे, कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद येथील एनसीसी ऑफिसर श्री माधव बांगर तसेच लोकहित विद्यालय, पुसद येथील एनसीसी ऑफिसर श्री विशाल इंगोले यांचा समावेश आहे.

सदर तिन्ही अधिकाऱ्यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, कामठी येथे दोन महिन्यांचे कठीण व शिस्तबद्ध प्रशिक्षण पूर्ण करून एनसीसी विभागात फर्स्ट ऑफिसर या रँकवर नियुक्ती मिळवली होती. त्यानंतर ४७ महाराष्ट्र बटालियन, यवतमाळ येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री अनुप नायर यांच्या आदेशान्वये त्यांना थर्ड ऑफिसरवरून सेकंड ऑफिसर पदावर पदोन्नती देण्यात आली.

या पदोन्नतीनिमित्त कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या गणवेशावर दोन स्टार लावून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोषटवार दौलतखान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वायकुळे होते. यावेळी पर्यवेक्षक तथा माजी एनसीसी अधिकारी श्री जाधव, श्री शिवाजी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री जीवने, लोकहित विद्यालयाचे माजी चीफ एनसीसी ऑफिसर श्री बुरकुले, ४७ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार श्री अंभोरे तसेच श्री नरेंद्र सिंह उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पसारे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री जागृत यांनी केले असून आभार प्रदर्शन श्री माधव बांगर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments