Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsअनधिकृत भिंतीचे बांधकाम थांबवून नागरिकांचा अडथळा | Pusad

अनधिकृत भिंतीचे बांधकाम थांबवून नागरिकांचा अडथळा | Pusad

अनधिकृत भिंतीचे बांधकाम थांबवून नागरिकांचा अडथळा | Pusad

पुसद/. जिनिंग च्या वादग्रस्त ठरलेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारानंतर आता सदर ठिकाणी होत असलेल्या रस्ते अडविण्याच्या बांधकामावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेत पोलीस स्टेशन सह नगरपालिका व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी दाखल केल्या आहेत. जोड रस्त्यावरच अवैधपणे मोठ्या भिंतीचे बांधकाम करण्याचे षडयंत्र होत असल्याने नागरिकांना नागरी सुविधा पासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

             निवासी उपयोगी अभिन्यासातील लेआउट मधून अप्रोच 15 मिटर रुंदीचा जोड रस्ता नारायन पाटील लेआउट गांधीनगर कडे जात असलेला रस्ता याच्या मधोमध जीनिंग चे जमीन धारक भिंतीचे बांधकाम करून रस्ता बंद करीत आहे. त्यामूळे वेळीच कायदेषिर कार्यवाही होवून अनधिकृतपणे भिंत बांधणेस मनाई करून अप्रोच जोडरस्ता प्रचलीतपणे कार्यान्वीत होणे बाबत मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा 👉पत्रकार चषक 2024 संपन्न । Journalist Cup 2024 concluded

     नगर परिषद पुसद अंतर्गत येणाऱ्या बस स्थानक परिसरातील वीज वितरण कार्यालयाच्या समोरील जागेवर

          नारायन पाटील ले आउट गांधीनगर मधील सर्व नागरिक यांनी पुसद खंड 1 मधील जुना शेत सर्व्हे नंबर 44/2 नविन 54/2 नझुल शिट न 88 मधील नगर भुगापन क्रमांक 3622 मध्ये निवासी उपयोगी अनिन्यासास मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांचे कडील पत्र क 313 दिनांक 8/11/2023 अन्वये मान्यता आहे. अभिन्यासातील 15 मिटर रूदीचा सदर जोडरस्ता मान्यता अभिन्यासातील धारक भिंत बांधुन बंद करीत असल्याचे दिसुन येत आहे. त्यमुळे वेळीच सदर भिंतीचे अनाधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जोडरस्ता – अप्रोच रस्ता भिंत बांधुन बंद करणे पासुन वेळीच पाबंद करून मज्जाव करणेस व होवू घातलेले रस्ता बंद करणेस भिंतीचे बांधकाम तात्काळ वेळीच थांबविण्यात यावे. अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.  असे न झाल्यास कायदा सुव्यवस्थोचा प्रश्न निर्माण होवून वादविवाद होण्याची शक्यता होवू शकते व शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा आशयाचे निवेदन नागरिकांनी दिली आहे. सदर निवेदन सहायक संचालक नगर रचना, यवतमाळ,  तहसिलदार पुसद, मुख्याधिकारी नगर परिषद पुसद, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद, ठाणेदार पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद यांच्याकडे तक्रार वजा निवेदन सादर केले आहे. 

हे ही वाचा 👉कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जागविण्यासाठी ताला ठोको आंदोलन | Pusad 

         दर निवेदनावर संजय काशिनाथ कुबडे, प्रभाकर मारोती पठारे, सुधाकर शंकर चव्हाण, विष्णु नथ्थु जाधव,फकिरा नारायण लोंढे,संतोष सखाराम कदम, पंजाबराव दत्तराव देशमुख,माधव सुखदेव गव्हाणकर, अन्नाजी पुसदकर, गणेश प्रकाश गायकवाड,चेतन जानुसिंग चव्हाण,शिवाजी रामजी बरगे, दत्तात्रय संभाजी कांबळे, संगरक्षीत ढोले, मिलींद दत्तात्रय कांबळे, माधवराव धोंगडे, विष्णु धोंगडे, सोहेल मैनुदिदन चव्हाण, चंद्रशेखर सिताराम भालेराव, दत्तराव धोंगडे, प्रभाकर नरोबा पाईकराव,अन्वर हुसेन अली मोहम्मद, मुनीर अहेमद, शेख जावेद, शे. चाँद, याहीया अहेस, सै. सलाउद्दीन, शम्मुसर, नजीद खान, मजीद खान,स. काजिम, मोहसीन खान, जावेद खान, प्रमोद सुखदेव गव्हाणकर, विजय सुखदेव गव्हाणकर,राहुल प्रभाकर पठारे,दयानंद प्रभाकर पठारे,ओमप्रकाश गायकवाड, जानुसिंग हुपसिंग चव्हाण, शरद काशिनाथ कुबडे,किशोर अन्नाजी पुसदकर, टिपू सुलतान कुरेशी, शेख मकसूद, शेख रउफ शेख कदिर, दानिश बागवान, मोहमद सलाम, यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments