पुसद – (तालुका प्रतिनिधी )
पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चोंढी गावात विकसित भारत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बहुतांश आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, विशेष करून महिला बालकल्याण व आरोग्य विभागांकडून महिलांमध्ये प्रचार केल्याचे दिसून आले. यावेळी विभाग प्रमुख यांनी आयईसी व्हॅनच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत अनेक योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री जणआरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना,हर घर नल योजना,पीक विमा, जन धन योजना, प्रधानमंत्री सन्मान योजना, महिलांसाठी गॅस योजना, ड्रोन डीजी योजना अशा अनेक योजनेतील माहीती लाभार्थ्यांशी यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.
या कार्यक्रमाला आ.श्री निलय नाईक, तहसीलदार महादेव जोरवर. प्रभारी गटविकास अधिकारी संजय राठोड, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, निळकंठ पाटील माजी सभापती, अविनाश देशमुख पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी के.पी. सोनटक्के टी. डी. चव्हाण, सुमित बोजेवार.सरपंच सौं मनीषा पांडे उपसरपंच, पृथ्वीराज चव्हाण,सचिव विजय इसलकर, दिनेश हांडे, दत्तराव गरिबे, ज्ञानेश्वर पांडे,अशोक गावंडे, गजानन पांडे, लक्ष्मण पांडे, गावातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिक , महिला बचत गटातील सर्व सदस्य, .सर्व विभाग प्रमुख विद्यार्थी व नागरिक संख्येने उपस्थित होते.
……………………………………………………………………………………………………




