Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeपतीने केली पत्नीची हत्या वसंतनगर पुसद येथील घटना | Husband kills wife,...

पतीने केली पत्नीची हत्या वसंतनगर पुसद येथील घटना | Husband kills wife, incident in Vasantnagar Pusad

Husband kills wife, incident in Vasantnagar Pusad

पुसद – शहरात व तालुक्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे. शहरात व तालुक्यात हत्या(Murder), हाफ मर्डर, चाकूहल्ले यां घटनाचे प्रमाण वाढतच जातं आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी (Crime) कमी करण्याचे फार मोठे आव्हान पोलीसांपुढे(Police) उभे राहिले आहे. आता पुन्हा एक हत्येची घटना पुसद शहरातील वसंत नगर येथे घडली आहे. पतीने घरगुती वादाच्या कारणावरून आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या(Murder) केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरातील वसंतनगर येथील टिपू सुलतान चौकातील रहिवासी असनाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीची दिनांक ७ जुलै २०२५  रोजीच्या मध्यरात्री (Midnight) १ ते २ वाजताचे दरम्यान घरगुती वादाच्या कारणावरून गळा चिरून हत्या(Murder) केली. मोहंमद आसिफ शफी कुरेशी वय अंदाजे २८ वर्षे असे आरोपी पतीचे नाव आहे तर सानिया मोहंमद आसिफ कुरेशी वय अं. २० वर्षे असे मयत झालेल्या पत्नीचे नाव आहे. दोघात घरगुती कारणावरून वाद झाला. व रागाच्या भरात आरोपी पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. यां घटनेची माहीती वसंतनगर पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविला. यां घटनेबाबत पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद येथे फिर्याद दाखल करणे सुरु आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments