पुसद – पार्डी गाव रस्ता समस्या ही पावसामुळे अधिकच गंभीर बनली आहे. पार्डी, मुख्य रस्त्यावर चिखल साचल्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता नसून चिखलाचे खड्डे उरले आहेत. ही पार्डी गाव रस्ता समस्या मागील अनेक दिवसापासून कायम आहे.
वाहतूक आणि पायी चालणे दोन्ही अशक्य
या पार्डी गाव रस्ता समस्येमुळे शाळकरी मुले, नोकरदार वर्ग आणि वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची चाके चिखलात अडकतात आणि पायी चालणाऱ्यांना घसरण्याचा धोका निर्माण होतो.
स्थानिक नागरिकांचा होतोय संताप…
“आम्ही वारंवार संबंधिताकडे आणि स्थानिक नेतेमंडळींकडे तक्रार केली आहे, पण अजूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. पार्डी गाव रस्ता समस्या सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी सोशल मीडियावरही आवाज उठवला आहे.
संबंधितांची उदासीनता ?
प्रशासनाकडून व सबंधीताकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, पण प्रत्यक्षात रस्त्यांची डागडुजी किंवा नवीन रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यामुळे पार्डी गाव रस्ता समस्या अधिकच गंभीर झाली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा मिळणे गरजेचे आहे.



