Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeरुग्णालय की अत्याचाराचे केंद्र? खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलीसोबत अश्लील वर्तन

रुग्णालय की अत्याचाराचे केंद्र? खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलीसोबत अश्लील वर्तन

पुसद : शहरातील एका खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याची धक्कादायक व घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. हे घृणास्पद कृत्य केल्याप्रकरणी पुसद शहर पोलीसांनी रुग्णालयांतील एका कंपाउंडरसह हे घृणास्पद कृत्य दडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालयाचे संचालक डॉकटरवर भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या घृणास्पद कृत्य प्रकरणातील आरोपी सध्या फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. परंतु रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पुसद शहर पोलीसांनी दिलेती माहिती अशी की, रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या ठॉक्टरांवर समाज देवासारखा विश्वास ठेवतो. त्यावेळी रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा हीच अपेक्षा असते. मात्र, पुसद शहरातीत्त खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयाचे संचालक ठॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा म्हणीला तडा दिला आहे. आपल्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीता रुग्णालयातील कंपाउंडरने नको त्या जागेवर स्पर्श केत्त्याची घृणास्पद व संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातीत एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताप आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला पुसद शहरातील एका नामांकित खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळेस डॉक्टरांनी त्या अल्पवयीन मुलींची रक्त तपासणी करण्यास सांगितले. रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठविले व रक्त तपासणीचा अहवाल आल्यानंतर तीला ठेंग्यूच्या आजार झाल्याचे निदान केले. रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास तिला सलाईन लावले परंतु तिचा ताप कमी होत नसल्याने तिच्या ठोक्यावर पट्ट्या लावून ताप कमी केला. व दुसऱ्या दिवशी त्या मुलीला जनरल वार्डमध्ये शिफ्ट करुन उपचार सुरू केला होता. त्यावेळी तिचे आई-वडील सुद्धा तीच्या सोबत होते. 

परंतु त्या मुलीचे वडील काही कामानिमित्त बाहेर निघून गेले होते. सलाईन सुरू असताना रुग्ण मुलीच्या आईला डोळा लागला होता. त्यावेळी आरोपी कंपाउंडर मुली जवळ येऊन त्या मुलीची आई झोपती असत्याचे पाहून त्यांने मुलीच्या नको त्या भागावर स्पर्श करीत हे घृणास्पद व संतापजनक कृत्य केले. त्यावेळी आरोपीच्या स्पर्शाने रुग्णमुलीला जाग आल्याने तीने आरडाओरड केली. त्यावेळी मुलीची आई तात्काळ झोपेतून जागी झाली. सदर प्रकार मुलीने आईला सांगितला. व ही सर्व घटना मुलीच्या आई-वडिलांनी क्रिष्णा बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. तुषार पवार यांना सांगितले परंतु या डॉक्टरांनी आरोपीला कोणतीही समज दिली नाही. उलट आरोपी हे घृणास्पद कृती करूनही रुग्णालयातच हजर होता. डॉक्टरांनी उलट हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रुग्ण मुलीच्या आई-वडिलांनी त्या मुलीला रुग्णालयातून घरी घेऊन गेले. व एवढे घृणास्पद कृत्य आरोपीने केले तरी डॉक्टर आरोपीला पाठीशी घालत असल्याने पीडित मुलीच्या आई- -वडिलांनी तात्काळ पुसद शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली. त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी तात्काळ सखोल चौकशी सुरु करीत या रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासून संबंधित रुग्णालयातील आरोपी कंपाउंडर समशेर उर्फ समीर वय २१ रा. बोरनगर याच्यावर तसेच रुग्णालयाचे सर्वेसर्वा संचालक डॉ. तुषार उदेभान पवार वय ५५ वर्ष यांनी एवढे मोठे घृणास्पद कृत्य दडविल्या प्रकरणी त्यांच्यावरही भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यान्वये कलम १०, २१/२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घृणास्पद कृत्य प्रकरणातील आरोपी सध्या फरार असुन त्याचा शोध पुसद शहर पोलीस घेत आहे. या घृणास्पद कृत्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उठाती असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments