Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenews"डासांचा नाश, आरोग्याची आशा ! पार्डी येथे टेमिफॉस मोहिम"

“डासांचा नाश, आरोग्याची आशा ! पार्डी येथे टेमिफॉस मोहिम”

पार्डी, ता. पुसद | दि. २४ जुलै २०२५हिवताप, डेंग्यू रोखायचा असेल, तर डासांचा जन्म थांबवाच लागतो! या उद्देशाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र जांबबाजार येथील उपकेंद्र पार्डीमध्ये किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक सर्वेक्षण आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

मा. जिल्हा हिवताप अधिकारी, मा. तालुका आरोग्य अधिकारी पुसद व मा. वैद्यकीय अधिकारी जांबबाजार यांच्या मार्गदर्शनाखाली, गावामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षण करून, डास अळी आढळून आलेल्या कंटेनर्समध्ये टेमिफॉस औषध टाकण्यात आले, व दूषित कंटेनर्स रिकामे करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून गावातील आरोग्यधोके रोखण्यासाठी तात्काळ कृती करण्यात आली.

तसेच, किरकोळ तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने गोळा करण्यात आले, जेणेकरून आजार लवकर ओळखून योग्य उपचार करता येतील. गावकऱ्यांना दर शनिवार कोरडा दिवस” पाळण्याचे आवाहन करण्यात आले आणि स्वच्छता व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली गेली.

आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा, आजारच टाळणं ही खरी शहाणपणाची गोष्ट आहे. या मोहिमेमार्फत गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, आजाराविषयी माहिती आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व पटवून देण्यात आले. ही मोहीम केवळ सरकारी कामगिरी न राहता, समाजाच्या आरोग्य संस्कृतीचा भाग ठरावी, हा यामागील उद्देश होता.

या उपक्रमात आरोग्य सेवक श्री. सुर्वे, श्री. कुकडे, श्री. सानप, श्री. हातमोडे, श्री. इंगोले, आरोग्य सेविका श्रीमती क्षिरसागर तसेच आशा स्वयंसेविका पल्लवी बरडे, सीमा पेंढारकर व विद्या जाधव यांचा उल्लेखनीय सहभाग होता.

ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत, स्वच्छता म्हणजेच सुरक्षा!” असा ठाम संदेश दिला.
एक दिवस कोरडा संपूर्ण वर्ष आरोग्यदायी!” या घोषणेने गावात जागरूकतेचा नवा सूर उमटला.


– अरुण बरडे DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments