Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsविद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची ‘भरारी’ – पार्डीतील ‘बरडे कोचिंग क्लास’चा प्रेरणादायी उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची ‘भरारी’ – पार्डीतील ‘बरडे कोचिंग क्लास’चा प्रेरणादायी उपक्रम

शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य आणि आनंदी बालपण घडविण्याचा संकल्प

पुसद – तालुक्यातील पार्डी गावात गेली तीन वर्षे एक अद्भुत आणि प्रेरणादायी कार्य सुरू आहे. भरारी बहुउद्देशीय संस्था अंतर्गत चालवला जाणारा बरडे कोचिंग क्लास’ हा केवळ शिकवणीचा वर्ग नाही, तर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे केंद्र बनला आहे.

फक्त १०० रुपयांच्या अल्प वर्गणीत हा उपक्रम सुरू ठेवला जातो. या रकमेतील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास, आरोग्य, सवयी आणि आनंद यांचा सुंदर संगम दिला जातो. दररोजच्या अभ्यासासोबतच लेखी परीक्षांचे प्रश्नसंच दिले जातात, तर प्रत्येक शनिवारी कविता सादरीकरण, गोष्टी सांगणे, चित्रकला, वाचन स्पर्धा अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिला जातो.

मुलांचा वाढदिवस येथे खास पद्धतीने साजरा केला जातो – त्या दिवशी रजिस्टर आणि पेन भेट देऊन अभ्यासाचा उत्साह वाढवला जातो. शिक्षणासोबतच जीवनातील आनंद अनुभवावा म्हणून वर्षातून तीन वेळा जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातात व डब्बापार्टी साजरी केली जाते.

चांगल्या सवयी लावण्यासाठी सकाळी ५ वाजता जॉगिंग आणि कसरतीचा उपक्रम राबवला जातो, ज्यामुळे मुलांचे आरोग्य आणि शिस्त दोन्ही वाढते.

आज, रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘चित्रकला स्पर्धेचे आयोजन’ करण्यात आले होते. ‘राखी’ हा विषय देऊन मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यात आला. रंगांच्या दुनियेत मुलांनी आपल्या भावंडांविषयीचे प्रेम, जिव्हाळा आणि सणाचा आनंद सुंदर चित्रांतून व्यक्त केला. या स्पर्धेत अनेक मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रत्येकाने आपल्या कल्पना रंगांच्या माध्यमातून मांडल्या. लहानग्यांचा उत्साह आणि सृजनशीलता पाहून उपस्थितांचा आनंद द्विगुणित झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments