पुसद दि २१ ऑक्टो. – ” दिव्यांपेक्षा उजळली माणुसकी- गरजू प्रभुजींची करूया आनंदाची दिवाळी” या उपक्रमांतर्गत माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशनच्या वतीने, या कार्यक्रमासाठी मदतीकरिता केलेल्या आवाहनाला पुसद शहरातील व शहराबाहेरील दात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या तीन-चार दिवसातच या कार्यक्रमा करिता लागणाऱ्या रकमेची पूर्तता झाली. व संस्थेला आता “पुरे झाले दान, आता कोणीही मदत करू नये” असे आवाहन करावे लागले.
माणुसकीची भिंत पुसद चे सदस्य दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुसद मधील बेघर व गरजू प्रभुजीं सोबत दिवाळीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी सुद्धा दिनांक २१ सप्टेंबर 2025 रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शनी मंदिर समोरील माणुसकीची भिंत परिसराची सदस्यांनी साफसफाई करून, हार व केळीचे खांब लावून हा परिसर सुशोभित केला.
त्यानंतर उपस्थित दात्यांच्या हस्ते सर्वप्रथम माता लक्ष्मी व कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर गरजवंत प्रभुजींची दाढी व कटिंग करून त्यांना बसवुन सुग्रास भोजन देन्यात आले. सोबतच त्यांना दिवाळीनिमित्त फराळाची पाकिटे, महिलांना नवीन साड्या व लुगडे, पुरुषांना व लहान मुलांना टी-शर्ट पॅन्ट धोतर देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी गरजवंतांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या निरस आयुष्यात माणुसकीच्या भिंतीच्या या उपक्रमाद्वारे आनंद व उल्हास निर्माण झाला.
माणुसकीच्या भिंतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन करून समाजासमोर सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे उत्तम उदाहरण ठेवले आहे.
मदत करणाऱ्या दात्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. गजानन जाधव, अरुण नागुलकर, पंकजपाल महाराज राठोड, मंगेश भगत, मधुकर चव्हाण, दिगंबर देशमुख, संतोष गावंडे, अनंता चतुर, पंजाब ढेकळे, सोहम नरवाडे, धनंजय कोठाळे, अनुराग चव्हाण, नर्मदा बालकिशन दरबस्तेवा, अनिल हरिदास राठोड वसंतनगर पोहरादेवी, मंथन शालीग्राम कदम, कृष्णा शंकरराव चापके, विनीत विष्णू\ उदावंत, सुनील तुकाराम जाधव, किरण किनाके, प्रमिलाताई खंदारे, प्रशांत दीपक लासिनकर, अर्जुन नारायण हगवणे, सचिन गणेशराव गावंडे, रूपाली नितीन नरडे, गोपाल सूर्या पाटील, मिलिंदराव बोबडे, ज्ञानेश्वर पुंडलिक राऊत, शशिकांत बा. जामगडे, अद्याया मनोज पोपट, जया मधुकर घड्याळे, एस. देवसरकर, संदीप भाऊरावजी मानकर, गजानन संजयराव तिलवंत, अमोल प्रकाशराव जगताप, सुदर्शन मारोतराव खंदारे, जयसिंग सिताराम राठोड, श्रीमती मंजुषा डेकाटे मॅडम, अरविंद पवार, अभिषेक विजय विश्वकर्मा, अविनाश मुखरे, रमेश डबोळे सर, अमोल नारायणराव\ सूर्य, अनघा विजय चक्करवार, अमित मधुकरराव पातुरकर, धीरज बालचंद आहाळे, दिग्विजयसिंह दिलीपसिंह सेंगर, मधुकर श्रीराम चिंतावार, नयनकुमार उत्तमलाल रामधनी, अमोल व्यवहारे, अनिल मधुकर वायकोस, हरगोविंद उत्तमराव कदम, सुशील सुगनचंद झांबानी, श्रीहरी राजेंद्र गादेवार, अंबादास शिवलिंग मुखरे, डॉ.अतुल सुरेशराव रुणवाल, मोहम्मद इमरान मोहम्मद सलीम, रवी रमेश उबाळे, गोपाल रामभाऊ कोहरे, मोहन विनायक जिचकार, अनुरूपा अनिल ठाकरे, नारायणराव बा. पुलाते, अमोल भाऊ तामसकर, सुरेश भाऊ वानखेडे, दीपक चक्करवार, अमर भाऊ आसेंगावकर, जया आनंद प्रभुणे, ज्योती बालाजी पाटील, विद्याताई राठोड, गौरव गुलाबराव नाईक, अनिता अनिल मोरे, अरुण भिमराव बरडे पार्डी, लक्ष्मण रूपला आडे, बंजारा कॉलनी पुसद, पृथ्वीराज लक्ष्मणराव राठोड सर हरीराम नगर दारव्हा, निवृत्तीनाथ बैस्कार, बाल प्रसाद, हिरालाल इनान, डॉक्टर,पदमवार, पुंजाराम मस्के, केशवराव वामनराव राजे (चार लुगडे चार पीस), नवक्रांती दुर्गा मित्र मंडळ मांडवा बावीस साड्या व पन्नास पीस, एक डझन लुगडे, एक डझन साड्या, एक डझन नाईट पॅन्ट व एक डझन टी-शर्ट श्री निशांत लक्ष्मणराव देऊळकर यांच्याकडून, बालाजी भाऊ बंडेवार पुसद श्रीरामपूर, सहावार साड्या एक डझन, प्रकाश त्र्यंबकराव पिंपळे, सहावार साडी १८ नग ,नेहरू पैजामा एक बेडशीट एक, टावेल तीन ,टोप्या,कपल बीसी काळी दौलत खान ब्लॅंकेट १४नग,मकरंद सदानंद सक्तेपार, सहावार साडी पाच नग याप्रमाणे पुसद मधील दात्यांनी दिवाळी सण साजरा करण्यासाठी माणुसकीची भिंतीला मदत केली.



