पुसद – येथील विश्रामगृह येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भिम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुसद शहरचे कर्तव्य दक्ष ठाणेदार सेवानंद वानखेडे साहेब उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब ,पुसद ग्रामीणचे कर्तव्यदक्ष ठाणेदार राऊत साहेब, सा.बा. पुसदचे उपविभागीय अभियंता कांबळे साहेब, पोलीस स्टेशन वसंत नगरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सतीश जाधव साहेब, जी.प. उपअभियंता सतीश नांदगावकर साहेब, डॉ. शिवाजीराव भुरके, जेष्ठ पत्रकार प्रकाश लामने, प्रा. दिनकर गुल्हाने हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष या सर्वांनी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जनार्धन गजभिये यांनी केले. तसेच पोलीस स्टेशन ग्रामीणचे ठाणेदार राऊत साहेब यांनी पत्रकार आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांची जवळीकता कशी असते यावर आपले विचार व्यक्त केले. नंतर प्रा. प्रकाश लांबणे सर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर जी.प. उप अभियंता सतीश नांदगावकर यांनी सुद्धा आपले पत्रकार दिनानिमित्त विचार मांडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ग्रामीण विकास, शासनाच्या योजना व लोककल्याणकारी उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका मोलाची आहे. शासन व प्रशासन पारदर्शक राहावे, विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी पत्रकारांचे सकारात्मक लिखाण प्रेरणादायी ठरते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार, सामाजिक संघटना व प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भिम टायगर सेनेने आयोजित केलेला हा सत्कार समारंभ समाजजागृतीच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
पोलीस स्टेशन वसंत नगरचे ठाणेदार सतीश जाधव यांनी सुद्धा आपले विचार मांडले. तसेच भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व भीम टायगर या सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बंधू हे निस्वार्थपणे वर्षभर यांच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी देऊन आम्हाला मोलाचे सहकार्य करतात असे विचार व्यक्त केले. व सर्वांचे आभार सुद्धा व्यक्त केले. नंतर अध्यक्ष म्हणून पुसद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करत असताना प्रशासन आणि पत्रकार ज्याप्रमाणे 24 तास काम करतात तसेच पोलीस प्रशासन सुद्धा 24 तास सेवा देतात त्यामुळे पत्रकारांचे आणि पोलीस प्रशासनाच्या जवळचे नाते असते अशा प्रकारचे विचार मांडले. शेवटी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा डायरी व पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन झोडगे, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर खंदारे, दीपक गायकवाड, संतोष गायकवाड, विष्णू सरकटे, रवी शिंगणकर, राजकुमार पठाडे, जगदीश साळवे, अरुण बरडे, राजू पठाडे, गजानन कांबळे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे आयोजन किशोर दादा कांबळे भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. गवई यांनी केले तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.



