Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsआईच्या तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना अन्नदान व वृक्षारोपण

आईच्या तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना अन्नदान व वृक्षारोपण

शिक्षक दांपत्याचा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम

पुसद | दिनांक ७ जानेवारी –   

श्री. मंगेश रामदासजी भगत यांच्या मातोश्री शांताबाई रामदासजी भगत (वय ७८) यांचे दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. आयुष्यभर कुटुंबासाठी त्याग करणाऱ्या आईची जिवंतपणी मनोभावे सेवा करत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यानंतर, निधनानंतर मात्र सामाजिक रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्णय भगत कुटुंबीयांनी घेतला.

या निर्णयानुसार मिशन ग्रीन पुसदचे अध्यक्ष श्री. रमेश डंबोळे तसेच माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष श्री. गजानन जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भवानी माता टेकडी, निंबी येथे तब्बल १२ फूट उंचीचे वडाचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले.

तसेच उपजिल्हा रुग्णालय, पुसद येथे रुग्ण, गरजवंत नागरिक व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्यात आले. दुःखाच्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना श्री. मंगेश भगत यांनी नागरिकांना आवाहन केले की, मृत्यूनंतरच्या अनावश्यक खर्चापेक्षा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून अन्नदान करावे व माणुसकीची भिंतमिशन ग्रीन सारख्या उपक्रमांना सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी स्वाती मंगेश भगत, सृष्टी मंगेश भगत, धृव मंगेश भगत, श्रीमती शोभा सुनील भगत (नांदेड), डॉ. पूजा सुनील भगत, डॉ. प्रसाद सुनील भगत, तसेच साहेबराव नलवडे, शालिनी नलवडे, गौरव नलवडे, चंद्रकांत पारटकर, मोनिका गजानन जाधव, वैष्णवी जाधव, पूजा इंगोले, डॉ. अंकिता शेट्टे, शांतीसागर इंगोले, यांच्यासह पंजाब ढेकळे, अनंता चतुर, मधुकर चव्हाण, साई वट्टमवार, देविदास खंदारे, शिवराम शेट्टे, प्रमोद ठाकूर, दीपक घाडगे, पवन बोजेवार, निखिल गादेवार, अमोल गंगात्रे, अमित हटवार, नयन रामधनी, अनिल कोटूरवार, विनोद शिंदे व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आईच्या स्मृती जपत समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम पुसद तालुक्यातील नागरिकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments