Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeCrimeहार्ड डिस्क सह 30,000 रु. चा मुद्देमाल जप्त - गुन्हे शाखा यवतमाळ...

हार्ड डिस्क सह 30,000 रु. चा मुद्देमाल जप्त – गुन्हे शाखा यवतमाळ यांची कार्यवाही


पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक 214/2024 कलम 379 भादवि हा गुन्हा अवघ्या 2 तासात उघड करुन आरोपी कडून चोरीस गेलेल्या हार्ड डिस्कसह एकूण 30,000/-रु किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कार्यवाही ……

पुसद प्रतिनिधी – 

यवतमाळ जिल्हात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी याचे समूळ उच्चाटन व्हावे, याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनीय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या आहेत.

दिनांक ०८/०४/२०२४  रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद स्थित पथकास गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक २१४/२०२४ कलम ३७९ भादवि हा गुन्हा स्वप्नील प्रकाश कांबळे रा. निम्बी यांनी केला असून, तो गुन्हयातील चोरीस गेलेल्या हार्ड डिस्कसह पुसद येथील दिपसंध्या हॉटेल समोर उभा आहे. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने, नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी जावून स्वप्नील प्रकाश कांबळे यास ताब्यात घेवून पंचासमक्ष त्याचे अंगझडती घेतली असता, त्याचे हाफ पॅन्टच्या खिशात ५  हार्ड डिस्क मिळून आल्याने, त्याबाबत विचारपूस केली असता, त्यानी सदरच्या हार्ड डिस्क जोशी फाटो स्टूडियो पुसद येथून चोरी केल्याचे कबूल करुन, गुन्हयाची कबुली दिली. हार्ड डिस्क व मोबाईल असा 30.000 रु मुददेमाल जप्त करून ताब्यात घेवून आरोपी स्वप्नील प्रकाश कांबळे वय 19 वर्षे, रा.लिबी ता. पुसद जि. यवतमाळ यास  पुढील कार्यवाही करीता पुसद शहर यांच्या ताब्यात दिले. 

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पवन बन्सोड (भा.पो.से.) सा. मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री पियुष जगताप (म.पो. से), सहा. पोलीस निरीक्षक श्री आधारसिंग , पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभार पोउपनि/ शरद लोहकरे, चापोउपनि रेवण जागृत  चापोउपनि/ रविंद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहया कुणाल मुंडोकार पोहवा/ रमेश राठोड, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बुरो रिपोर्ट – रॉ भारत न्यूज़ 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments